बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बैलगाडा शर्यतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

मुंबई | राज्यात बैलगाडा शर्यतींना असलेल्या बंदीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार बैलगाडा शर्यतींना बंदी आहे. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत शर्यत सुरू करण्याची मागणी केली आहे, अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

बैलगाडा शर्यतीवेळी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे गुन्हे माघारी घेणार असून त्या लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न करू, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. या घोषणेमुळे शेतकरी आणि गाडा मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंबेगाव तालुक्यात मंचर उपजिल्हा रुग्णालयातील नव्या सुविधांच्या लोकार्पणावेळी गृहमंत्री बोलत होते.

दिलीप-वळसे पाटलांनी ही घोषणा करताना सर्वांना एक आवाहनही केलं आहे की, खटले मागे घेणार याचा अर्थ असा नाही की बैलगाडा शर्यत भरवा, त्यामुळे कोणीही शर्यती भरवू नका, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं. आंबेगावमध्ये ते बोलत होते.

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये स्पर्धा भरवली होती. त्यानंतर त्यांनी 2 च्या सुमारास धावपट्टी बनवत सकाळी पहाटे 5 वाजता स्पर्धा भरवली. त्यामुळे पडळकर आणि इतर 41 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपमध्ये येण्यास नारायण राणेंची खुली ऑफर

राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेलं जनावर- रावसाहेब दानवे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More