शिवसेनेला गृहखातं हवंय?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
मुंबई | महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादीवर (NCP) नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) त्यांच्याविरोधात तत्परतेने कारवाई करत नाहीत त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी गृहखातं आपल्याकडे घ्यावं, असं शिवसेनेतील काही नेत्यांचं मत आहे.
शिवसेनेने गृहमंत्रीपद मागितल्याच्या चर्चा रंगत असताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. वर्षा बंगल्यावर होणाऱ्या या भेटीत याच मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने गृहमंत्रीपदाची मागणी केली तर राष्ट्रवादी ही मागणी मान्य करेल का?, हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदा घेत भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. मात्र, तरीही गृहमंत्र्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राष्ट्रवादीची भाजप विरोधात मवाळ भूमिका असल्याने यावरून शिवसेना व राष्ट्रवादीत धूसफूस सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आज दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मी पुन्हा येईन असं म्हणणं देखील एप्रिल फुलच आहे”
संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा, म्हणाले…
जो बायडन यांचं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…
Gold Rate: गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात घसरण, तपासा ताजे दर
“रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपासही सीबीआय आणि ईडीकडून करण्याची गरज”
Comments are closed.