राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम! गृहमंत्री वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे पाडव्यापासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी सरकारला भोंगे उतरवण्यावरून अल्टिमेटम दिला होता.
राज्य सरकारनं 3 तारखेपर्यंत भोंगे उतरवावेत असं ठाकरे म्हणाले होते. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मशिदी किंवा मंदिरांवरील परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढणार नाही, असं पाटील म्हणाले आहेत.
न्यायालयानं परवागनी दिलेले भोंगे काढण्याचा कोणताही आदेश दिला नाही, असंही वळसे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळं आता मनसे आणि राज्य सरकारमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे लावू नयेत, असं न्यायालयानं म्हटल्याचं देखील पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यात परत एकदा भोंगे लावण्याच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. राज्यात कसलिही कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न येत नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“माफ करा बाबासाहेब… आमची लायकीच नाही”; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
“मी महाराष्ट्राला वचन देतो की…”; सोमय्यांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज
“…हा तर राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकाॅर्ड”; फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका
“शरद पवार जातीवादी नाहीत”; पवारांवर केंद्रीय मंत्र्याची स्तुतीसुमनं!
Russia-Ukraine War| युक्रेनसाठी अमेरिकेने उचललं मोठं पाऊल
Comments are closed.