महाराष्ट्र मुंबई

महिलेने मारहाण केल्यानंतरही संयमाने परिस्थिती हाताळणाऱ्या एकनाथ पार्टेंचा गृहमंत्र्यांकडून सत्कार!

मुंबई | महिलेने मारहाण केल्यानंतरही संयम बाळगणाऱ्या वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलिस असो किंवा मुंबई महापालिकेचे कर्मचारी, त्यांच्यावर हल्ले होणे योग्य नाही, असं सांगत गृहमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला. तसेच पोलीसही माणूस असतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करा, असं आवाहन देशमुखांनी केलंय.

मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे हवालदार एकनाथ पार्टे यांना कर्तव्यावर असताना मारहाण झाली. ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम व धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल पार्टे यांचा सत्कार केला, असं अनिल देशमुखांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईतील काळबादेवी परिसरात वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई करत असताना हवालदार एकनाथ पार्टे यांनासादविका तिवारी नावाच्या महिलेने मारहाण केली होती. पार्टे यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा तिने केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार- वर्षा गायकवा

“एक वेळ अशी येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

“शरद पवारांकडे ‘हर मर्ज की दवा’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला”

जो बायडन यांनी फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसात घेतली सभा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या