बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

पुणे | सध्या सोशल मीडियावर पुण्यातील महिला डीसीपींची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लीपमध्ये डीसीपी आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला पुण्याच्या सदाशिव पेठेतील एसपीज बिर्याणी हाऊस येथून फुकट बिर्याणी आणण्यास सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे. ही ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीपबद्दल बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पुण्यातील महिला पोलीस उपायुक्तांची व्हायरल होणारी ती ऑडिओ क्लीप मी सुद्धा ऐकली. हा खूप गंभीर प्रकार आहे.

व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लीपमध्ये महिला डीसीपी आपल्या ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत बोलत आहेत. पुण्यामध्ये बिर्याणी, प्रॉन्झ कुठे चांगला मिळतो, असा प्रश्न डीसीपी पोलीस कर्मचाऱ्याला विचारत आहेत. यानंतर डीसीपी त्या कर्मचाऱ्याला चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणीची ऑर्डर देतात. तसेच आपल्या हद्दीतील हॉटेलला पैसे देण्याची काय गरज असं देखील बोलतात.

महिला डीसीपींची ही ऑडिओ क्लीप पाच मिनिटांची आहे. डीसीपींच्या या कारभाराला वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीत मॅडमच्या गैरकारभाराला आळा घालण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

Maharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल

शरद पवार आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण

‘या’ कारणामुळे शेतकऱ्यानं शेतात लावला चक्क सनी लिओनीचा पोस्टर!

“भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग; जावई तुरुंगात जाईल तेव्हा मोदी सरकार पडेल”

पुणे मेट्रोच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More