महाराष्ट्र मुंबई

“मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा अनेकांनी विडाच उचलला होता, पण…”

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला.  आमच्या पोलिसांना बदनाम करण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. काहींनी असा विडाच उचलला होता. पण आमच्या पोलिसांनी त्यावर चोख प्रत्युत्तर दिलं. आमचे पोलीस कोरोना संसर्ग काळात सतत काम करून थकले असले तरी त्यांची हिम्मत हरलेली नाही, असं अनिल देशमुख म्हणाले.

मुंबईत पोलिसांना गस्त घालण्यास मदत व्हावी म्हणून सेगवे प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पेट्रोलिंगसाठी सेगवेचा चांगला उपयोग होणार असल्याचा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

मुंबई पोलिसांमध्ये आता अश्वदलाचाही समावेश केला आहे. ड्रोन पोलिसिंगसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन वर्षाच स्वागत करताना नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचं चांगलं पालन केलं. त्यामुळे नवीन वर्षात कुठेही गालबोट लागलं नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरळी सी फेसवर पेलिसांना सेगवे म्हणजेच विद्यूत स्कुटर्स देण्यात येत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेगवेचं उद्धघाटन होणार आहे. यावेळी सिनेअभिनेेते अक्षय कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार

जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले

‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र

मी हा विचार कधीही केला नव्हता; ‘या’ गोष्टीबद्दल सनी लिओनीचा मोठा खुलासा

भारतीय संघाच्या खेळाडूंनी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही; बीसीसीआयचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या