नवी दिल्ली | लॉकडाऊन असलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरू करण्यासाठी पंजाब सरकारने दारूची दुकाने सुरू व्हावीत यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होता. परंतू गृह मंत्रालयाने पंजाब सरकारची ही मागणी फेटाळून लावली आहे.
केंद्रिय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने उघडी ठेवण्याची पंजाब सरकारच्या विनंतीला लाल कंदिल दाखवला आहे. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, “पंजाब सरकारने दारूची दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतू सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून गृह मंत्रालयाने ही मागणी अमान्य केली आहे”.
गृह मंत्रालयाने 15 एप्रिलला काढलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात दारू, गुटखा, तंबाखूवरील विक्रीवर कडत प्रतिबंध आणले आहेत. लॉकडाऊन काळात ही विक्री पूर्णपणे बंद राहील, अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत.
लॉकडाऊन काळात काही राज्यांचे मुख्यमंत्री दारू दुकाने उघडण्यासाठी परवानगी मागत आहेत. गुरूवारी महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महसूल सुरू होण्याकरिता राज्यातील दारू दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, असं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
भक्त मंडळी सध्या रिकामटेकडी, कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकरी शेकवीत आहेत- संजय राऊत
बीड जिल्हा कोरोनामुक्त; धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचं कौतुक
महत्वाच्या बातम्या-
1200 तबलिगी अजूनही गायब; तपासासाठी पोलिस जंग जंग पछाडतायेत
17 लाखांपेक्षा जास्त लोक परराज्यात अडकले आहेत, त्यांना परत आणणं सध्या मुश्किल- बिहार सरकार
हा अपघाताने पसरलेला विषाणू नाही तर हा अमेरिकेवर हल्ला; ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टीकेचा बाण
Comments are closed.