केसांच्या समस्यांनी हैराण आहात? ‘हा’ घरगुती हेअर मास्क देईल तुम्हाला मोठा दिलासा!

Hair Care Tips

Hair Care Tips | वाढते प्रदूषण, चुकीची जीवनशैली, आहारातील असमतोल यामुळे अनेक जण केसगळती, कोरडेपणा, कोंडा, पांढरे केस यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा तात्पुरता परिणाम होतो, पण दीर्घकालीन फायदा हवा असेल तर घरगुती उपाय सर्वोत्तम ठरतात. यासाठी काही सोप्या आणि प्रभावी नॅचरल हेअर मास्क आठवड्यातून 1-2 वेळा वापरल्यास केस पुन्हा मजबूत, रेशमी आणि चमकदार होऊ शकतात.

कोरफडीचा जेल आणि नारळ तेल :

कोरफड ही एक उत्तम हायड्रेटिंग घटक आहे. यात असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्म कोंड्याचा नाश करतात. कोरफडीचा ताजा जेल आणि नारळ तेल मिक्स करून टाळू आणि केसांना लावा. 30 ते 40 मिनिटांनी केस धुवावेत.

Hair Care Tips | ऑलिव्ह ऑइल मसाज :

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अ‍ॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात. केस गळती आणि कोरडेपणा दूर होतो. कोमट ऑलिव्ह ऑइलने केसांना मसाज करा आणि 1 ते 2 तासांनी सौम्य शॅम्पूने धुवा. (Hair Care Tips)

दही आणि आवळा पावडर हेअर मास्क :

एक चमचा दही + दोन चमचे आवळा पावडर मिक्स करून टाळूवर लावा. 25 ते 30 मिनिटांनी शॅम्पूने केस धुवा. यामुळे कोंडा कमी होतो आणि केसांची वाढ सुधारते. मात्र याआधी पॅच टेस्ट नक्की करा.

केळी आणि मधाची पेस्ट :

केळी मॅश करून त्यात मध मिक्स करा. ही पेस्ट केसांना लावून 20 ते 25 मिनिटांनी धुवा. यामुळे केस ओलसर, रेशमी आणि मजबूत होतात. कोरडेपणावर हा उपाय विशेष फायदेशीर आहे. (Hair Care Tips)

News Title: Home Remedies for Hair: Natural Hair Masks to Control Hair Fall and Boost Shine

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .