बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिलांनी घर विकून शिकवलं; पोरानं पहिल्या प्रयत्नातच केली UPSC ची परीक्षा क्रॅक

नवी दिल्ली | अनेक युवक युपीएससी क्रॅक करण्याचं स्वप्न पाहतात. मात्र त्यांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. अशात प्रदीप याच्या यशाची कहाणी कोणालाही प्रेरणादायी ठरेल. प्रदीपने आयएएस होण्याचं स्वप्न त्याच्या लहानपणी पाहिलं होतं. या कारणामुळे त्यांनी युपीएसीची परिक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नातच त्याचं स्वप्न पुर्ण केलं.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या प्रदीप सिंहने युपीएसीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र तो एका मध्यम घराण्यातील असल्यामुळे त्याला क्लासेससाठी किंवा इतर गोष्टींसाठी पैसे जमवणं आवघड होतं. या कारणांमुळे त्याच्या वडिलांनी त्यांचं घर विकून प्रदीपला युपीएसीची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठवलं.

घर विकल्याच्या जाणीवने प्रदीपने दिवस रात्र मेहनत घेऊन प्रचंड आभ्यास केला. त्याच्या या प्रयत्नांना यश देखील आलं. प्रदीपने त्याची युपीएसीची परिक्षा पार पाडली. मात्र त्याच्या रँकनुसार त्याची निवड आरएसएसमध्ये झाली. यामुळे त्यानं दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि त्याचं स्वप्न पुर्ण करुन तो भारतातून 26व्या क्रमांकाने आयएएस बनला.

दरम्यान, एका मुलाखतीत प्रदीपने युपीएससी परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या मुलांना सल्ला देखील दिला आहे. एक रणनिती तयार करुन सतत मेहनत घेणं आवश्यक असल्याचं प्रदीपने या मुलाखतीत सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा गमतीदार व्हिडीओ

‘संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

‘मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे…’; त्या व्हायरल व्हिडीओवर बाबुल सुप्रियोंचं स्पष्टीकरण

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या फायनलवर कोरोनाचं सावट; गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More