बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘होमगार्ड आहे होमगार्डसारखा राहा…’, पुण्यातील महिलेचा संतापजनक व्हिडीओ

पुणे | सध्या देशात कोरोनाच्या वातावरणामुळे अनेक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. अशातच नियमाचे उल्लंगघन करणाऱ्या एका महिलेला ऑनड्यूटी असणाऱ्या होमगार्डने रोखलं होतं. याचा त्या महिलेला प्रचंड राग आला असून त्या महिलेने त्या होमगार्डसोबत अतिशय वाईट भाषेत वाद घातला. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

ही घटना पुण्यातील दांडेकर पुलावरील आहे. या पूलावरुन महिला आपल्या अलिशान कारमधून चार जणांसोबत प्रवास करत होती. नियमानुसार एकाच गाडीतून 4 लोकांना जाण्यासाठी परवानगी नसल्याने होमगार्डने त्या गाडीला रोखलं. याचाच महिलेला प्रचंड राग आला. यानंतर महिलेने तिथेच वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद घालताना या महिलेने तु होमगार्ड आहेस ना तर होमगार्डसारखा राहा असं म्हटलं आहे. एवढच नाही तर खाकी वर्दी घातली म्हणजे पोलीस नको बनू, असं देखील यावेळी या महिलेने म्हटलं आहे. या महिलेचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक नागरिकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, कोरोना काळात अनेक लोक नियमांचे उल्लंघन करत आहेत. मात्र यानंतर देखील लोक आपली चुक मान्य न करता ड्यूटीवर असणाऱ्या होमगार्डशी वाद घालतात आणि त्यांनाच सवाल करतात.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

‘अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही’; दादरच्या राड्यावर ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध मीच देणार आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; 895 संशयित कोरोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह

‘घरातून एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर…’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More