मला माझ्या गर्लफ्रेण्डसोबत राहू द्या, समलिंगी प्रेमिकेची विनवणी

मुंबई | रेश्मा आणि प्रीती या समलिंगी मुली एकमेकांसोबत रहात होत्या मात्र समाज आणि कुटुंबाच्या दबावामुळे आणि विरोधामुळे पोलिसांच्या मदतीनं त्यांची ताटातूट केली. मुंबई मिरर या वृत्तपत्रानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

मुंबईत राहणारी रेश्मा मोकेनवार तिची नातेवाईक प्रीती सरकिला एकमेकींच्या प्रेमात पडल्या. घरच्यांच्या विरोधामुळे त्या शिर्डीला पळून गेल्या. मात्र पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेतलं.

कुटुंबियांनी तुम्हाला हवं तसं जगू देऊ असं सांगितलं, मात्र पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताच हात मुरगळून वेगवेगळ्या गाडीत नेलं, असं रेश्मानं सांगितलं.