बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

होंडाचा सर्वात मोठा धमाका, सर्वात स्वस्त कार होणार लाँच, फक्त 5 हजार रुपयात!

नवी दिल्ली | जपानची प्रसिद्ध कार कंपनी होंडाने अल्पावधितच भारतात आपला चांगला जम बसवला आहे. कंपनीने याआधी वेगवेगळ्या कार लाँन्च केल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी होंडा कंपनी आपली नविन कार भारतात लाँन्च करत आहे. कंपनी आपली सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय सिडान कार लाँन्च करत आहे. होंडा अमेझ नविन फेसलिफ्ट व्हर्जन असून या कारच्या प्री-बुकिंगसाठी सुरूवात झाली आहे.

होंडा कंपनीची सर्वात जास्त खप असणारी कार म्हणून होंडा अमेझ बाजारात सर्वांना परिचीत आहे. कंपनीने तीन वर्षापूर्वी होंडा अमेझ सेकंड जनरेशनचे व्हर्जन ग्राहकांच्या भेटीला आणलं होतं. यावेळेस कंपनी फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करणार आहे. नविन व्हर्जन हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये असणार आहे. या गाडीचा लूक हा आकर्षक असून आणि यात भरपूर मोकळा स्पेस आहे. यामध्ये वेगवेगळे रंग उपलब्ध असणार आहेत.

नविन कारमध्ये फुल लईडी हेडलॅप, नविन अलॉय व्हील्स, नविन फ्रंन्ट, रिअर बंपर असणार आहे. कारच्या समोरील बाजूला जास्त क्रोम एलीमेंटचा वापर असणार आहे. नविन कारमध्ये हे 1.2 लिटर  I-VTEC पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन 90 बीएचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्क तयार करतं. दुसरं इंजिन 1.5 लिटर डिझेल युनीट असणार आहे. हे इंजिन 100 बीएचपी पॉवर आणि 200 एनएम टॉर्क तयार करतं.

होंडाच्या या सिडान कारमध्ये इंटीरिअर डिझाईन आधीप्रमाणेच असणार आहे. कारमध्ये ब्लकबेझ थीम असण्याची शक्यता आहे. कारच्या इंटिरीअरपेक्षा एक्स्टीरीअर मध्ये बदल होणार आहेत. नविन होंडा अमेझ कंपनीच्या संकेतस्थळावरून प्री-बुकिंगसाठी 5000 रूपयांत करता येईल. याकारच्या डीलरशिप्सच्या प्री-बुकिंगसाठी 21 हजार रूपये टोकन रक्कम आहे. नविन होंडा अमेझ आधीच्या कारपेक्षा 25 किंवा अधिक रूपयांनी स्वस्त असण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात होंडा अमेझची किंमत 6.22 ते 9.99 लाख आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

‘नवरा मुर्ख वाटायला लागतो’, पाहा भन्नाट मराठी कविता

देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये!

डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले तरी काळजी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

कौतुकास्पद! पोराने आईच्या कष्टाचं केलं चीज, 50 व्या वाढदिवसाला दिलं खास गिफ्ट

तुमचं जेवढं वय झालंय ना तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द आहे”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More