बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कपडे बदलत असताना ते माझ्या खोलीत आले आणि….’; हनी सिंगच्या पत्नीचे सासऱ्यावर धक्कादायक आरोप

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग त्याच्या पत्नीमुळे अडचणीत आला आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अशातच शालिनी तलवारे हनी सिंगच्या वडिलांवर गंभीर आणि धक्कादायक आरोप केला आहे.

एकदा सासरे दारुच्या नशेत मी कपडे बदलत असताना माझ्या रुममध्ये आले आणि त्यांनी माझ्या छातीवरून हात फिरवल्याचं शालिनी तलवारने म्हटलं आहे. शालिनीने दाखल केलेल्या याचिकेमध्ये 10 कोटींच्या भरपाईचा दावा केला आहे. शालिनीनं त्याच्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली आहे. 

हनी सिंग लग्नाची अंगठी घालत नव्हता. त्याचे बाहेर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही शालिनीने केला आहे. गेल्या 10 वर्षापासून तिचा छळ होत असल्याचं म्हटलं आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे हनी सिंगने मारहाण केल्याचंही तिने आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. शालिनीनं याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण असल्यामुळे हनी सिंह स्वतःच्या आणि पत्नीच्या संयुक्त मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, दिल्लीतील तीस हजारी न्यायालयानं हनी सिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून याविषयी उत्तर मागितलं आहे. 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यासाठी हनी सिंगला मुदत देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही- अमृता फडणवीस

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती, 18 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत!

रौप्य पदक मिळवत इतिहास रचणाऱ्या रवीकुमार दहियावर बक्षिसांचा वर्षाव; 4 कोटी, गावात स्टेडियम अन्…

‘हा’ पॅक त्वचेला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More