बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकाच विमानात 53 कोरोनारुग्ण आढळल्याने ‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

नवी दिल्ली | भारतात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यातच भारतातून दररोज परदेशात जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप प्राप्त केल्यानंतर जवळपासच्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

हाँगकाँगमध्ये कोरोनाचा संसर्ग गेल्या काही महिन्यांपासून आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. पण भारतातून हाँगकाँगमध्ये पोहोचलेल्या एका विमानात तब्बल 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हाँगकाँगने भारतासह पाकिस्तान आणि फिलिपिन्सवरून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर दोन आठवड्यांची बंदी घातली आहे.

जगातील कोरोनावर मात करणाऱ्या किंवा कोरोनाशी दोन हात करून चांगला सामना देणाऱ्या देशांपैकी एक देश म्हणून हाँगकाँगची ओळख आहे. एका वेळी एकाच विमानातून 53 कोरोनाबाधित रुग्ण सापडने ही हाँगकाँगसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण संपूर्ण देशात जेवढे कोरोनाबाधित रुग्ण सापडतात तेवढे एकाच विमानात सापडल्याने प्रशासन खडबडून जागं झालं.

भारतातून प्रवास करून विस्तारा या विमानाने हाँगकाँगमध्ये पोहोचलेल्या प्रवाशांपैकी 53 जणांची कोरोना चाचणी पॉझिटव्ह आल्यानंतर प्रशासनाने चर्चा करून भारतातून येणाऱ्या सर्व विमानांवर तसेच प्रवाशांवर पुढचे दोन आठवडे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात भारतातून हॉंगकॉंगमध्ये कोणालाही प्रवास करता येणार नाही.

थोडक्यात बातम्या –

कोरोनापासून बचावासाठी WHO ने जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना!

देशासाठी कायपण! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रतन टाटांनी उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल

“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती; 22 जणांचा मृत्यू

‘हा कठीण काळ आहे’; मालदीवमध्ये एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुती हासन भडकली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More