बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त 2 धावांनी हुकली चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची ऑरेंज कॅप

नवी दिल्ली | लोकप्रिय क्रिकेट लीग आयपीएलचा अंतिम टप्पा पार पाडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयपीएल दोन टप्प्यात खेळवण्यात आलं. पहिला टप्पा भारतात तर दुसरा टप्पा युएईमध्ये खेळवण्यात आला. या आयपीएलमध्ये अनेक विक्रम रचण्यात आले. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणं प्रत्येक खेळाडूचं लक्ष असते. यावर्षीची ऑरेंज कॅप चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतूराज गायकवाडनं पटकावली आहे.

महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडने यंदा अप्रतिम प्रदर्शन केलं आहे. ऑरेंज कॅपसाठी यावर्षी सुद्धा मोठी स्पर्धा रंगली होती. पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल, दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन, चेन्नईचा सलामीवीर फाफ डू प्लेसीस, चेन्नईचा सलामीवीर ऋतूराज गायकवाड या प्रमुख खेळाडूमध्ये ऑरेंज कॅपसाठी जोरदार टक्कर झाली.

फाफ डू प्लेसीस अवघ्या 2 धावाने ऑरेज कॅपपासून दूर राहिला आहे. अंतिम सामन्यापुर्वी डु प्लेसीस 547 धावांसह चार नंबरवर होता. अंतिम सामन्यात 86 धावांची तडाखेबंद खेळी करून 633 पर्यंत मजल मारली पण ऋतूराज गायकवाडनं 635 धावा केल्यानं डू प्लेसीसची संधी हुकली आहे. स्पर्धेच्या प्रारंभीपासूनच केएल राहूल ऑरेंज कॅपचा दावेदार होता पण त्याच्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपल्यानं तो ऑरेंज कॅप मिळवण्यापासून वंचित राहिला.

दरम्यान, ऋतराज गायकवाड ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. ऋतूराज गायकवाडनं आपल्या सातत्यपुर्ण खेळीनं क्रिकेट विश्वातील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याची लवकर संधी मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

उद्यापासून राज्यात मुसळधार पाऊस! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

अफगाणिस्तानात पुन्हा मृत्यूतांडव! तीन बॉम्बस्फोटात तब्बल ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

“सत्तेचं व्यसन हा अमली प्रकार, या अमली प्रकाराचा बंदोबस्त कुणी करायचा?”

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील सर्व जहाल मुद्दे एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More