बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् अवघ्या 10 सेकंदात हुकलं दीपक पुनियाचं कांस्यपदक!

टोकियो | टोकियो ऑलिम्पिक कुस्तीच्या स्पर्धेत दीपक पुनिया 86 वजनी गटात खेळणाऱ्या दीपक पुनियाला अवघ्या 10 सेकंदासाठी कांस्य पदकाने हुलकावनी दिली. रवी कुमार दहियाप्रमाणे दीपकच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र त्याच्या पदरी निराशा पडली आणि भारताचं आजचं तिसरं पदक गेलं. थरारक सामन्यात मायलीस अ‍ॅमिनेलाने या खेळाडूने दीपकचा पराभव केला.

या अगोदर अमेरिकेच्या डेव्हिस मॉरिसकडून उपांत्य फेरीतही दीपक पुनियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताला आता कास्यंपदक तरी मिळणार, या आशावर सर्व भारतीय बसले होते. परंतु मायलीस अ‍ॅमिनेलाने दीपक पुनियाचा 3-2 ने पराभव केला.

सामन्याच्या पहिल्या तीन मिनिटांत स्पर्धेचा 2-1 असा स्कोअरकार्ड चालला होता. अटीतटीच्या सामन्यात दीपकने शेवटच्या मिनिटात आक्रमक पद्धतीने खेळून गुण मिळवण्याऐवजी बचावत्मक खेळ केला. तिथेच त्याला या गुणांचा मोठा फटका बसला. त्यानंतर सामन्यातील अवघे 20 सेकंद शिल्लक असताना समाेरच्या खेळाडूूने दीपकचा पाय पकडला. त्यामुळे दीपकच्या हातातला असलेला सुरूवातीचा एक गुण आणि नंतरचे दोन गुण मायलीसला मिळाले आणि अंतिम क्षणी गुणांच्या आघाडीमुळे मायलीस विजेता ठरला. त्यामुळेच दीपकचं ऑलिम्पिकमधील कांस्यपदकही हुकलं.

दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या काही सेकंदामध्ये मिळालेल्या गुणांसंदर्भात पुनियांनं पंचांना चॅलेंज केलं. परंतु पंचांनी त्याची पुन्हा एकदा व्हिडीओ पाहून तपासणी केली. त्यावनंतर पंचांनी आपला निर्णय कायम ठेवत समाेरच्या खेळाडूला दोन गुण दिले.

थोडक्यात बातम्या-

राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही- अमृता फडणवीस

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती, 18 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत!

रौप्य पदक मिळवत इतिहास रचणाऱ्या रवीकुमार दहियावर बक्षिसांचा वर्षाव; 4 कोटी, गावात स्टेडियम अन्…

‘हा’ पॅक त्वचेला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा!

सुवर्ण पदक हुकलं पण भारतीयांचं ह्रदय जिंकलंस! अंतिम लढतीत रवीकुमार दहियाचा पराभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More