बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीव्ही सिंधूकडून पदकाची आशा कायम; प्री- क्वाॅर्टर फायनलमध्ये धडक

टोकियो | भारताला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकवून देणारी भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली सुरूवात केली आहे. इस्राईलच्या खेळाडूला हरवून सिंधूने विजयी सलामी दिली होती. त्यानंतर आता सिंधूने हाँगकाँगच्या खेळाडूचा पराभवकरून प्री- क्वाॅर्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. तिच्या या दमदार कामगिरीनंतर भारताच्या आशा देखील उंचावल्या आहेत.

पहिल्या सामन्यात विजय झाल्यानंतर पीव्ही सिंधूचा दुसरा सामना हाँगकाँगची खेळाडू च्युंग एनगान हिच्यासोबत होता. या सामन्यात सिंधूने दमदार प्रदर्शन करत च्युंग एनगानला 21-9 आणि 21-16 अशा सलग दोन सेटमध्ये पराभूत केलं. सामन्याच्या सुरूवातीपासून सिंधू आक्रमक खेळत होती. तिने प्रतिस्पर्धीला मैदानात जास्त काळ टिकू दिलं नाही. पहिल्याच सेटमध्ये सिंधूने च्युंग एनगानचा 21-9 च्या फरकाने पराभव केला.

पहिला सेट खिश्यात घातल्यानंतर सिंधू हा सामना आरामात जिंकेल अशी चिन्हे होती. मात्र च्युंग एनगानने आक्रमक खेळी केली. पण तिचा डाव वेळीच ओळखत सिंधूने दुसऱ्या सेटमध्ये देखील बाजी मारली. सिंधूने दुसरा सेट 21-16 ने जिंकला आणि सामना जिंकून थेट प्री- क्वाॅर्टर फायनलमध्ये धडक दिली आहे.

दरम्यान, भारताला पीव्ही सिंधूकडून ऑलिम्पिक पदकाच्या अपेक्षा आहेत. पहिल्या दोन सामन्यात सिंधूने आक्रमक खेळी करून आपल्या महत्त्वकांक्षा स्पष्ट केल्या आहेत. आता सिंधूचे होणारे पुढील सामने नाॅक आऊट पद्धतीनं होणार आहेत. 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदक पटकवलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More