होर्डिंग दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर!

Hording Collaps Video | नुकताच मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे अवकाळी पावसाने अनेकांचा जीव घेतला. वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली होती. जनजीवन विस्कळीत झाले. मोठी हानी देखील झाली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून होर्डिंग पडल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. (Hording Collaps Video)

व्हिडीओ व्हायरल

घाटकोपर येथे धक्कादायक घटना घडली. घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावर अवकाळी पावसात होर्डिंग पडल्याने पेट्रोल पंपच जमीनदोस्त झाले, मात्र त्या होर्डिंगखाली तब्बल 100 लोकं अडकली गेली. त्यातील 14 लोकांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. होर्डिंग पडलेला व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडीत केला गेला होता. तर हवाई वाहतूक देखील ठप्प झाली होती. यामुळे मुंबईकरांचा ऐनवेळी मोठा खोळंबा होऊन बसला होता. (Hording Collaps Video)

तसेच यामध्ये आता बचावर कार्य हे अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बचाव कार्यात  NDRF, BPCL, MMRDA, अग्निशमन दल, BMC यांचा समावेश करण्यात आला आहे. तर यामध्ये ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती भूषण गगराणी यांनी दिली आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारने मदत केली आहे.

अनधिकृत होर्डिंगबाबत मनपाच मोठं पाऊल

मुंबईत झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे आता भूषण गगराणी यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. भूषण गगराणी यांनी बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. ती होर्डिंग हटवली जाणार आहे. तसेच नेमून दिलेली होर्डिंगच्या मानकांमध्ये साईज, होर्डिंगमधून पास होणारी हवा, स्ट्रक्चर स्टॅबिलिटी ही मानके ठरवली आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

तसेच आता पेट्रेल पंपाबाबतही कारवाई करणार असल्याची मुंबई आयुक्तांनी माहिती दिली आहे. पेट्रोल पंप चालवण्याचा परवाना दिला होता. ते आता तपासले जात आहे. त्याकडे जर परवाना नसेल तर यावर कारवाई केली जाणार असल्याचं गगराणी म्हणाले आहेत.

News Title – Hording Collaps Video In Mumbai During Unseasonal Rain Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?

लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत

मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा

ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

कमी किमतीत खरेदी करा 6 एअरबॅग असलेल्या आकर्षक कार