आज गौरी विसर्जनाच्या दिवशी ‘या’ 5 राशींना देवी करणार धनवान!

Horoscope Today | आज 12 सप्टेंबररोजी गौरी-गणपतीचे विसर्जन असणार आहे. त्यामुळे आज देवी पार्वती आणि गणरायाची कृपादृष्टी विशेष राशींवर राहणार आहे. आज भाद्रपद महिन्याची शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. तसेच, आज आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि मूळ नक्षत्र योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. याचा फायदा काही राशीला होणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय लाभ होणार, ते पाहुयात. (Horoscope Today)

‘या’ राशींवर राहणार देवीची कृपा

मिथुन रास : आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला असणार आहे. आज तुम्ही कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करू शकता. तुम्हाला यश मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांना आज नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचे संबंध आणखी फुलून येतील.

सिंह रास : तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या कुटुंबात पैसा खेळता राहील.आज तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीची आज तुमच्यावर कृपा राहील. यामुळे आज दिवसभर मन प्रसन्न राहील(Horoscope Today)

कुंभ रास : कुंभ राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने नव्या संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. वरिष्ठांचं सहकार्यही मिळेल. मुलांच्या सुख-सुविधांची पूर्तता होईल. नवविवाहित जोडप्याला आनंदाची बातमी मिळू शकते. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल.

कन्या रास : तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नव्या संधी देणारा असेल. त्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मकर रास : आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. तुमच्यावर देवीची कृपा राहील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. आज प्रवास योग आहे.(Horoscope Today)

News Title : Horoscope Today 12 September 2024 

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राशींनी आज सावध राहावे, तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेतला जाऊ शकतो!

वडिलांच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मलायकाचा पहिला VIDEO समोर

राज्यात टायफॉईडची साथ, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सर्वसामान्यांना कांदा रडवणार! दर कमी होणार की नाही?

या दोन मोठ्या बँकांना RBI ने दिला दणका; ग्राहकांवर काय परिणाम होणार?