Horoscope Today | आज 25 मार्च 2025, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पवित्र पापमोचनी एकादशी आहे. भगवान विष्णूच्या कृपाशिर्वादासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घेऊया, या विशेष दिवशी तुमच्या राशीचं भविष्य काय सांगतंय आणि कोणत्या राशींवर श्रीविष्णूंचा विशेष आशीर्वाद असणार आहे. (Horoscope Today)
आजचे रासीभविष्य
मेष (Aries):
कौटुंबिक प्रगतीचे संकेत आहेत. कार्यसिद्धी मिळेल. आज एखादी नवीन संधी मिळू शकते. तुम्ही मेहनतीवर भर द्याल तर यश तुमचं ठरेल.
वृषभ (Taurus):
वैवाहिक आयुष्यात समाधान लाभेल. दिवस ऐषआरामात जाईल. घरात तुमचा निर्णय मान्य केला जाईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील.
मिथुन (Gemini):
स्वतःच्या मतावर ठाम राहाल, परंतु हट्टीपणामुळे वादविवाद टाळावेत. भावनिक असंतुलन राहू शकतं. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
कर्क (Cancer):
गोंधळलेल्या मन:स्थितीवर नियंत्रण ठेवा. कामात अडथळे येऊ शकतात. वरिष्ठांशी कटुता येणार नाही याची काळजी घ्या.
सिंह (Leo):
विचारांमध्ये स्थैर्य ठेवा. अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळेल. आहारात पथ्य पाळा आणि अनावश्यक विचारांपासून दूर राहा.
कन्या (Virgo):
जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. समाजात तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra):
घरगुती वादांना वाढवू नका. सर्व बाबतीत संतुलन ठेवा. स्मरणशक्तीचा अधिक उपयोग होईल. आर्थिक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.
वृश्चिक (Scorpio):
भावंडांशी सहकार्य वाढवा. मित्रांचा पाठिंबा मिळेल. प्रवासात काळजी घ्या. वरिष्ठांची मर्जी राखावी.
धनू (Sagittarius):
कामांमध्ये अडथळे संभवतात. कौटुंबिक प्रश्न सुटण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. (Horoscope Today )
मकर (Capricorn):
कामातील उत्साह टिकवून ठेवा. डोकेदुखी आणि पित्त विकार त्रास देऊ शकतात. जीवनशैलीत संतुलन ठेवा.
कुंभ (Aquarius):
गप्पांमध्ये वेळ घालवाल. तणाव घेऊ नका. जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. घरगुती स्वच्छतेकडे लक्ष द्याल.
मीन (Pisces):
वादाची शक्यता आहे. आध्यात्मिक सल्ला फायदेशीर ठरेल. मनासारखी खरेदी होईल. घराबाहेर वावरताना दक्षता घ्या.
Title : Horoscope Today 25 March 2025