Horoscope Today | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे (Horoscope Today) तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
त्यानुसार आजचा 1 ऑगस्टचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल, याबाबतचे राशीभविष्य खाली दिले आहे. आज काही राशीच्या व्यक्तींसाठी संघर्षाचा दिवस असेल. आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आजचे राशीभविष्य
मेष राशी : आज कुणाचेही ऐकून निर्णय घेऊ नका. तुमचे जवळचे लोकच तुमचा विश्वास तोडू शकतात. नोकरीच्या बाबतीत गाफील राहू नका. जवळचा मित्र प्रमोशनमध्ये अडथळा (Horoscope Today)ठरू शकतो. नवीन सुरुवात करत असाल तर कुणालाही काहीही सांगू नका. तुमचं काम करत राहा, यश नक्की मिळेल.
वृषभ राशी : आज तुमच्या व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. आज तुमचे मोठे वाद होऊ शकतात. त्यामुळे बोलताना शब्द जरा जपून वापरा. अनावश्यक वाद होतील तितके टाळा. अन्यथा, मोठं नुकसान होऊ शकतं.
मिथुन राशी : व्यवसायात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. काही कामात बिकट परिस्थिती निर्माण होईल. आध्यात्मिक श्रद्धा जागृत होईल. उद्योग धंद्यात काही अडथळे आल्यानंतर व्यवसायात यश मिळेल.
कर्क राशी : राजकारणातील भामट्यांपासून सावध (Horoscope Today)राहा. अन्यथा तुमची प्रतिष्ठा जाऊ शकते. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल. अविवाहितांना विवाहाशी संबंधित सकारात्मक बातम्या मिळतील.
कन्या राशी : दुसऱ्याच्या वादात पडणे टाळा, अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी अनावश्यक व्यत्यय येऊ शकतो. प्रवासात मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. ती चोरीला जाऊ शकते. आज तुम्हाला दिवसभर काही न काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही मन आणि डोके शांत ठेऊन (Horoscope Today)काम करा.
News Title- Horoscope Today August 1
महत्वाच्या बातम्या-
दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी; होमगार्ड पदांसाठी भरती सुरू
राज्यात पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना IMD चा महत्वाचा इशारा
ऐकावं ते नवलंच! टेलीग्रामचा संस्थापक तब्बल 100 मुलांचा बाप, स्वतःच केला खुलासा
पती अभिषेकला सोडून ऐश्वर्या राय पोहोचली परदेशी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनदर