‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ, सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण

Horoscope Today | आज कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून हर्ष योग, लक्ष्मी नारायण योग, हर्षण योग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. आज ऑगस्ट महिन्याचा दुसरा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ (Horoscope Today) ठरणार आहे.

आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज मासिक शिवरात्रीचं व्रत असणार आहे. पंचांगानुसार लक्ष्मी नारायण योग, हर्षण योग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचा थेट लाभ काही राशीच्या व्यक्तींना होणार आहे.

आजचे राशीभविष्य

वृषभ : आज तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार आहे. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आज (Horoscope Today)रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील.

कर्क : आज तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सगळं काही मिळेल. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आर्थिक लाभ होईल आणि मान-सन्मान वाढेल.

तूळ : तुम्हाला आज मोठा धनलाभ होईल. कुटुंबात आज उत्साहाचे वातावरण राहील. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी (Horoscope Today)फायदेशीर गुंतवणूक कराल.

वृश्चिक : आज तुम्हाला नवीन संधी मिळतील, त्याचा फायदा घ्या. तुम्हाला उत्तम सहकारी लाभेल.उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आज जवळच्या व्यक्तीसोबत प्रवासाचा योग आहे.

धनु : आज व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. आज तुमचे मित्र-मंडळी भेटतील, त्यांच्यासोबत स्वादिष्ट पदार्थांचा (Horoscope Today)आनंद घ्याल. तुमचे नियोजित काम आज पार पडेल, त्यामुळे दिवसभर आनंदी राहाल. आज तुम्हाला संतुष्ट वाटेल.

News Title- Horoscope Today August 2

महत्वाच्या बातम्या-

“नकार देऊन सुद्धा मला मित्रासोबत झोपायला…”, करिश्माच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं

नवरा सिगरेट ओढत असेल तर आत्ताच व्हा सावध, धक्कादायक माहिती आली समोर

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं जिंकलं भारतीयांचं मन; PM मोदी खास पोस्ट करत म्हणाले..

“मृत्यू नंतर माझं..”; मनोज जरांगे यांची वाढदिवशी मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक