Horoscope Today | आज 10 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी रात्री 11 वाजून 13 पर्यंत राहील. आज मंगळवारी अनुराधा नक्षत्र रात्री 8 वाजून 4 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आजच्या दिनविशेषबद्दल बोलायचे झाल्यास आज मंगळवारी गौरीचे आवाहन केले जाईल.(Horoscope Today )
आज ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस मेष ते मीन राशींचा कसा जाईल हे जाणून घेऊयात.
आजचे राशीभविष्य-
मेष रास : आज चिडचिड करू नका. बोलताना शब्द जपून वापरा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.
वृषभ रास : आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल. व्यवसायात लाभ होईल.(Horoscope Today )
मिथुन रास : मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका. कुटुंबात शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.
कर्क रास : नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. आज तुमचे अडथळे दूर होतील. कोणतेही काम यशस्वी होईल.
सिंह रास : आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमासाठी आजचा दिवस खास असेल. प्रिय व्यक्तीसाठी आज आवडती वस्तु खरेदी कराल.(Horoscope Today )
कन्या रास : व्यापार करणाऱ्यांचे चांगले दिवस येतील. या राशीचे विवाहस्थळ जुळून येतील. विवाहातील सर्व अडथळे दूर होतील.
तूळ रास : आज शेअर मार्केटमध्ये तुम्हाला फायदा होईल. व्यापार वाढीस लागेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ असेल.
वृश्चिक रास : कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज जास्त धावपळ होईल.(Horoscope Today )
धनू रास : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, यामुळे मन शांत राहील.सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल. आज प्रवास योग आहे.
मकर रास : या राशीच्या व्यक्तींनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, चोरी होण्याची शक्यता आहे. बाहेरचे पदार्थ खाऊ नका. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
कुंभ रास : मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. कोणत्याही वादात अडकू नका. मन शांत ठेवा.(Horoscope Today )
मीन रास : घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.
News Title : Horoscope Today September 10
महत्वाच्या बातम्या-
शरद पवार गटाचा बारामतीचा उमेदवार ठरला, युगेंद्र पवार यांनाच मिळणार तिकीट?
“देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत; त्यांना रोमान्स कळत नाही, त्यांना फक्त…
सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली; धनंजय मुंडेंची खंत अखेर ओठावर
आयफोनप्रेमींनो… जाणून घ्या iPhone 16 सिरिजची किंमत काय असणार?
पुणेकरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार