लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार, मिळणार अमाप पैसा!

Horoscope Today | आज 11 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज मंगळवारी प्रीती योग रात्री11 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर ज्येष्ठा नक्षत्र रात्री 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे.(Horoscope Today)

भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीला जोडूनच अनुराधा नक्षत्र असेल त्यादिवशी गौरी आवाहन असते. त्यानंतर गौरी पूजन असते आणि शेवटी गौरी विसर्जनाने समाप्ती होते. आज गौरी पूजन असणार आहे. आजच्या या शुभ दिनी कोणत्या राशीना फायदा होईल, ते पाहुयात.

आजचे राशीभविष्य

मेष रास : आज तुम्हाला प्रत्येक कामात योग्य साथ मिळेल. जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. आज तुमची सगळी कामे मार्गी लागतील. खूप दिवसांपासून त्रस्त असलेल्या गोष्टीपासून सुटका होईल. यामुळे आजचा दिवस स्मरणात राहील. आज तुमचे झोपलेले भाग्य जागे होईल. तुम्ही आज नव्याने सुरुवात करू शकता.(Horoscope Today)

कन्या रास : तुम्हाला आज नवीन गुंतवणुकीतून लाभ होईल. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. आज तुम्ही सोने-चांदी खरेदी कराल. वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील. प्रवास योग देखील आहे. आज तुम्हाला जवळचे व्यक्ती भेटतील.(Horoscope Today)

धनू रास : खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींचा शोध आज पूर्ण होईल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल. घरी सुख-समृद्धी येईल. आजचा दिवस खरेदीचा असेल.

मीन रास : नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल. आज तुम्ही नवीन उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नवीन संधी देणारा असेल. महिलांसाठी आजचा दिवस आनंदी पण तितकाच धावपळीचा जाईल. (Horoscope Today)

News Title : Horoscope Today September 11  

महत्वाच्या बातम्या-

मुलीच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे, ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?

जगभरात BCCIची नाचक्की! वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण?

महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXX’, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य

मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ