महादेव आज ‘या’ राशींवर प्रसन्न होणार, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Horoscope Today September 16 

Horoscope Today | आज भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सोमवारी दुपारी 3 वाजून 11 मिनिटांपर्यंत राहील. तसेच रात्री 11 वाजून 42 मिनिटांपर्यंत सुकर्म योग जुळून येईल, त्यानंतर धृती योग सुरु होईल. याशिवाय सायंकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी सूर्याचा कन्या राशीत प्रवेश होईल. याचा काही राशीला लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर आज सोमवारच्या दिवशी महादेवाची देखील काही राशीच्या व्यक्तीवर कृपा राहील. आता या राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय लाभ होणार, ते पाहुयात. (Horoscope Today)

आजचे राशी भविष्य

मेष रास : या राशीच्या व्यक्तींना नोकरीत मान-सन्मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे. तुमचे खूप दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळतील.  गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

वृषभ रास : आज तुमच्या कलेला वाव मिळेल.तुम्हाला तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात खबरदारी घ्यावी. कामात धांदल टाळावी. एखाद्यावर अति विश्वास टाळावा. (Horoscope Today)

मिथुन रास : आज तुमच्यावर शंकराची कृपा राहील. तुम्हाला जोडीदाराकडून फायदा होईल.तुमच्या व्यवसायातील अडचणी आज दूर होतील. तुम्हाला नवीन संधी प्राप्त होईल. आज अचानक धनलाभ होण्याची देखील दाट संभावना आहे.

कर्क रास : भागीदारीतील निर्णय धीराने घ्या. तडकाफडकी कोणतेही काम करू नका. नवीन प्रकल्प लक्ष वेधून घेईल. आज नवीन कार्य सुरू करू शकता, नशीब तुम्हाला साथ देईल. (Horoscope Today)

कन्या रास : आज तुम्हाला आवडीचे विवाहस्थळ येतील. शंकराच्या कृपेने तुम्हाला कोणत्याही कार्यात यश मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. प्रेमातील व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आवडत्या व्यक्तीसोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल. (Horoscope Today)

News Title : Horoscope Today September 16 

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज कुठं कुठं पाऊस पडणार?, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

आज ‘या’ 3 राशींना लाभणार सूर्यदेवाची कृपा, सर्व संकट होणार दूर!

पुणे हादरलं! महिला पोलिसाचा धक्कादायक कारनामा

विधानसभेपूर्वीच भाजपकडून जोरदार बॅनरबाजी; फडणविसांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

पुणेकरांनो गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘हे’ 17 रस्ते राहतील बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .