आज शेवटच्या श्रावण सोमवारी ‘या’ राशींचं भाग्य उजळणार, नशिबात सुख-समृद्धी देणार

Horoscope Today | आज 2 सप्टेंबररोजी शेवटचा म्हणजेच पाचवा सोमवार असणार आहे. आज भगवान शंकराची भक्त मनोभावे पूजा करतात. तसेच, आज श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असणार आहे. अमावस्या तिथी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी सुरु होईल. तसेच सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत शिवयोग चालू राहणार आहे.(Horoscope Today)

आज श्रावणातला शेवटचा सोमवार काही राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आज काही राशींचे भाग्य उजळणार आहे.आज महादेवाची कृपा नेमक्या कोणत्या राशीवर राहणार, याचे राशी भविष्य खाली सविस्तर दिले आहे.

आजचे राशी भविष्य

मेष : आज कोणतेही कार्य करताना घाई करू नका. मन विचलित होऊ देऊ नका. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. आज कुटुंबाच्या इच्छेनुसार, काही कार्य कराल.(Horoscope Today)

वृषभ : आज तुम्ही हातात घेतलेली कामे पूर्ण होतील.नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस. आज तुम्ही लग्नाबाबत मोठा निर्णय घ्याल.

मिथुन : आज तुमच्यावर शंकराची कृपा राहील. तुमचं नशीब आज उजळणार. सुख-समृद्धी लाभेल. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. (Horoscope Today)मनापासून केलेले कार्य सत्कर्मी लागेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

कर्क : आज जूने मित्र भेटतील. मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन ठरेल. मौज-मस्ती कराल. आजचा दिवस एकंदरीत छान जाईल.

सिंह : आज तुम्हाला गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. सरकारी कामे आज मार्गी लागतील. नवीन घर घेण्याचा विचार कराल. आज मुलांसाठी खरेदी कराल.(Horoscope Today)

कन्या : महादेवाच्या कृपेने तुमची आज सगळी कामे मार्गी लागतील. प्रेमासाठी आजचा दिवस खास असेल. विद्यार्थ्यांना आज मोठं यश मिळेल.तुमचे कौतुक होईल. परदेशात शिकण्याची संधी मिळेल. महिलांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल.

News Title : Horoscope Today September 2

महत्वाच्या बातम्या- 

‘…अन्यथा तुतारी वाजवू’; राष्ट्रवादीच्याच नेत्याचा अजित पवारांना इशारा

मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसह संपवलं आयुष्य

भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!

‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ

पायाला दुखापत असतानाही शरद पवार अनवाणी पायाने जोडे मारो आंदोलनात सहभागी!