Horoscope Today |आज 4 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल प्रतिपदा तिथी असणार आहे. प्रतिपदा तिथी पहाटे 9 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर द्वितीया तिथी सुरू होईल. आजच्या दिवशी उत्तर फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. तर आज राहू काळ दुपारी 12 ते 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय बुधवारी रात्री बुध सिंह राशीत प्रवेश करेल. बुधाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.(Horoscope Today)
आजचे राशी भविष्य-
मेष रास : तुम्ही ठरवलेल्या गोष्टी आज मार्गी लागतील. कामातील अडथळे दूर होतील. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.(Horoscope Today)
वृषभ रास : आज दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस. प्रयत्नात कसूर करू नका. नवीन मित्र भेटतील. व्यवसायाच्या दृष्टीने मोठा निर्णय घ्याल.
मिथुन रास : कठीण कामे सुलभतेने करू शकाल. व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. आरोग्य जपा. जवळचा प्रवास योग आहे.
कर्क रास : आज व्यवसायात तुम्हाला लाभ होईल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल. मनात असलेल्या इच्छा आज सत्यात उतरतील.
सिंह रास : आज खर्च करताना जरा विचार करा. आजचा दिवस ताण-तणावाचा असेल. चिडचिड होईल. त्यामुळे मन शांत ठेवायचा प्रयत्न करा.(Horoscope Today)
कन्या रास : आज कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. पगारवाढ होईल. नवीन जबाबदारी मिळेल. तुमचे कर्तृत्व उभरून येईल. मोठ्यांकडून शाबासकीची थाप मिळेल.
तूळ रास : कामाचा जोर कायम ठेवावा. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. महिलांचा आजचा दिवस धावपळीचा असेल.(Horoscope Today)
वृश्चिक रास : कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल.
धनू रास : व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. आज तुम्हाला धनलाभ होईल.
मकर रास : अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ रास : जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. आवडत्या ठिकाणी फिरायला जाल. खरेदी कराल. एकंदरीत आजचा दिवस आनंदी जाईल. (Horoscope Today)
मीन रास : कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.
News Title : Horoscope Today September 4
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारीख जाहीर
पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गेले तडे!
पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार
… तर यापुढे अहमदनगर नव्हे तर ‘अहिल्यानगर’; नामांतरास ग्रीन सिग्नल