Horoscope Today | आज 7 सप्टेंबररोजी ‘गणेशोत्सव’ सणाला सुरुवात होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. चतुर्थी तिथी आज संध्याकाळी 5 वाजून 38 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज ब्रह्मयोग जुळून येणार आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. (Horoscope Today)
आज देशभरातील नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येतील. गणेशोत्सवाची धूम आजपासून सुरू झाली आहे. आज गणपती बाप्पा कोणाच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येईल, ते पाहुयात.
आजचे राशी भविष्य
मेष : आज घरात प्रसन्नाचे वातावरण राहील.धनलाभाचे योग जुळून येतील. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
वृषभ : गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची सगळी संकटे दूर होतील.तुमचे सुवर्णदिवस येतील. सगळी दुःख दूर होतील. तुमच्या मनातील इच्छा बाप्पा पूर्ण करेल.(Horoscope Today)
मिथुन : कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. आज तुम्ही मोठी आर्थिक गुंतवणूक कराल. खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे.
कर्क : हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. सरकारी कामे मार्गी लागतील.
सिंह : प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. नोकरी करणाऱ्याचे आज प्रमोशन होईल. तुमच्यावर बाप्पाची कृपा राहील.(Horoscope Today)
कन्या : घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या. तुमच्या मताला महत्व दिले जाईल. तुम्ही आयुष्याबाबत मोठा निर्णय घ्याल, जो तुमचं भविष्य ठरवेल.
तूळ : दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. आजचा दिवस चांगला जाईल. मन शांत ठेवा.
वृश्चिक : आज प्रवासाचा योग आहे.फसवणुकीपासून सावध राहावे. चिडचिड करू नका. अन्यथा कटू बोल बोलल्याने मोठे नुकसान होऊ शकते.
धनू : हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण(Horoscope Today) होईल. धार्मिक भावना वाढीस लागेल. आज दानधर्म कराल.
मकर : सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. व्यापारीवर्ग खुश राहील. त्यांना मोठा धनलाभ होईल.
कुंभ : कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या सगळ्या अडचणी आज दूर होतील.
मीन : विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. बाप्पाच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल. यामुळे मन आज प्रसन्न राहील.(Horoscope Today)
News Title : Horoscope Today September 7
महत्वाच्या बातम्या-
“… म्हणून आम्ही सारखे दिल्लीत जातो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
‘किती वेळा नवरे बदलले तू…’; एकनाथ खडसे संतापले
कॅन्सरने त्रस्त असलेल्या हिना खानला झाला आता ‘हा’ आजार!
गौतमी पाटीलसोबत घडला भयानक प्रकार!
…XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही; पंकजा मुंडे असं कोणत्या नेत्याला म्हणाल्या