Horoscope Today | आज 9 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीचा प्रारंभ होत आहे. ही षष्ठी तिथी सोमवारी रात्री 9:54 पर्यंत राहील. तसेच विशाखा नक्षत्र आज संध्याकाळी 06:04 पर्यंत राहील. याशिवाय आज सूर्यषष्ठी व्रत देखील आहे. आज सोमवारी महादेवाच्या कृपेने काही राशींना सुखाचे दिवस येणार आहेत. (Horoscope Today )
आजचे राशी भविष्य
मेष रास : आज तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल आणि सर्व क्षेत्रांमध्ये तुम्ही प्रगती कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर खूप मेहनत करावी लागेल. आज तुम्हाला व्यवसायात लाभ होईल.
वृषभ रास : आज तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुम्हाला फसवण्याचे प्रयत्न होतील. तुम्ही हुशारीने निर्णय घ्या. कोणत्याही वस्तूचा अतिरेक नुकसानदायक ठरू शकतो, हे लक्षात ठेवा.(Horoscope Today )
मिथुन रास : आज तुम्हाला आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्य आणि आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका. जमीन खरेदी करण्याचा विचार मनात येईल. फळ विक्रेत्याना आज लाभ होईल. विद्यार्थ्यांना आज ताण येऊ शकतो.
कर्क रास : तुमच्या सन्मानात वाढ होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. मोठ्या प्रमाणात पैसा मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.(Horoscope Today )
सिंह रास : आज भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या अडचणी दूर होतील. तुमच्यावर सुखाचा वर्षाव होईल. आज कुटुंबात शुभ वार्ता मिळेल. लग्नाच्या बाबतीत निर्णय घ्याल.
कन्या रास : तुमच्या घरी कोणत्यातरी महत्त्वाच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाने कौटुंबिक वादविविद होण्याची शक्यता आहे. तुम्ही मन शांत ठेवा. उद्धटपणा भोवू शकतो. त्यामुळे शांत राहून निर्णय घ्या.(Horoscope Today )
तूळ रास : ऑफिस आणि घर यात अंतर असायला हवे. दोन्ही एकमेकांमध्ये गुंतले तर समस्या होवू शकते. रात्री मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. जवळच्या व्यक्तीशी आज भेट होईल.
वृश्चिक रास : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. तुमचे सर्वांशी संबंध चांगले राहतील. तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याची दाट संभावना आहे. आज तुम्ही खरेदी देखील कराल. प्रेमासाठी देखील आजचा दिवस खास असणार आहे.
धनू रास : इतरांच्या कामांसाठी जास्त वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका, कारण असे लोक सतत तुमच्याकडे नवीन मागण्या करत राहतील. तुमची आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मकर रास : जोडीदारासाठी आज खरेदी कराल.कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत. आज प्रवास योग आहे. आपल्या सामानाची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाऊ नका.
कुंभ रास : व्यापारी वर्गाला आजचा दिवस फायद्याचा असेल. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आज फायदा होईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. तुमचे प्रमोशन होईल.(Horoscope Today )
मीन रास : बोलताना विचार करून बोला. कामातील काही समस्या सुटतील. बुद्धीने निर्णय घ्याल, ज्याचा परिणाम त्वरित दिसून येईल. तुमच्या निर्णयाचे कौतुक होईल. तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
News Title : Horoscope Today September 9
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ नेता करणार घरवापसी?
गणेश चतुर्थीनिमित्त सरकारने घेतला मोठा निर्णय!
मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!
“शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही”