बुलडाणा | जालना रस्त्यावर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होत की त्यामध्ये 1 ठार तर 25 जण जखमी झाले असल्याची माहिती समजत आहे. हॉटेल वीरासमोर जालनाच्या दिशेने देऊळगाव राजाकडे जाणाऱ्या बसला चिखलीहून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आहे.
या अपघातात मृत झालेल्यांमध्ये 80 वर्षाच्या गयाबाई खंडारे या जागीचा ठार झाल्या आहेत. तर 25 लोकांमधील 23 लोक हे किरकोळ जखमी झाले आहेत तर 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. रक्षाबंधनासाठी माहेरी जात होतं तर काही राखी बांधून परत आपल्या घरी जात होते..
अपघातामध्ये बसचालक मोहसीन करीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालकाच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वेळीच ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आलं आणि प्रथमोपचार करण्यात आले.
दरम्यान, शहराबाहेरून जाणारा हा रस्ता धोक्याचा मार्ग ठरत आहे. दोनच दिवसांपूर्वी कुंभारीवर ट्रक दुचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये तरूण ठार झाला होता. आता दुसऱ्या टोकाला हा अपघात झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता ईडीच्या दारात, वाचा काय आहे प्रकरण!
तालिबानचं बलाढ्य अमेरिकेला दिलं आव्हान; ‘या’ तारखेपर्यंत सैन्य मागे घ्या नाहीतर…
बीएसएफ जवानाच्या बहिणीने बांधली अस्थिकलशाला बांधली राखी, फोटो पाहून तुम्हालाही येईल रडू!
“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”
शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी
Comments are closed.