बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजब लग्नाची गजब वरात! नवरदेवाला घेऊन घोडा फरार, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. पण अशे मोजकेच व्हिडीओ असतात जे लक्षात राहातात. लग्नाच्या अशाच एका अजब गजब वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहुन तुम्हालाही हसु आवरणार नाही.

लग्न निर्विघ्न पार पडावं यासाठी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू असते. कितीही प्रयत्न केले तरी ऐनवेळी काहीना काही धांदल उडतेच. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत वरातीदरम्यान चक्क घोडाच नवरदेवाला घेऊन फरार झाला आहे.

घोड्यावर बसलेल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी फटाके फोडण्यात आले. पण अचानक फुटलेल्या फटाक्यांच्या आवाजाने वरातीचा घोडा दचकला आणि सैरभैर पळू लागला. हा घोडा लोकांच्या गर्दीतून नवरदेवाला घेऊन पळून जाताना दिसत आहे.

नवरदेवाला घेऊन फरार झालेल्या या घोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. काही जणांनी नवरदेवाची खिल्ली उडवली आहे तर काही जणांनी नवरदेवासाठी चिंता व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

थोडक्यात बातम्या-

बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाचा चपराक; आता नियम मोडले तर..

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा मोठा खुलासा, म्हणाली…

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी Omicron मुळे पहिला बळी

राहुल गांधींची मुंबई सभा होणार?; उच्च न्यायालयात याचिका दाखल

“त्यांच्या बापाशी लढून मी पक्षाबाहेर पडलोय, नाना पटोले कुणाच्या…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More