महाराष्ट्र मुंबई

‘खराब रस्ते बनवाल तर…’; नितीन गडकरींचा इशारा

मुंबई | जागतिक रस्ते अपघातांबद्दल माहिती घेतली तर, त्यातील सुमारे 11 टक्के अपघात हे भारतातील आहेत. मात्र काही ठोस प्रयत्नांमुळे सध्या रस्ते अपघातांची संख्या कमी झाली आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

जागतिक बँकद्वारे आयोजित एका रस्ता सुरक्षा कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

स्त्याच्या सदोष रचनेसाठी जबाबदार असणाऱ्याना नितीन गडकरी यांनी ताकीद दिली आहे. असे खराब रस्ते बांधणाऱ्यांना कडक शिक्षा होणार आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.

पूर्वीच्या तुलनेत सध्या रस्ते अपघात 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. आणि आम्ही अजूनही यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच सरकारचे प्रयत्न पाहता आम्हाला विश्वास आहे की, येणाऱ्या काळात यात आणखी घट होईल आणि आम्ही त्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत, असं गडकरींनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार ‘ही’ योजना!

एक दिवस ही ‘ईडी’च भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबत”

…म्हणून क्रिकेटपटू मनदीप सिंह शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाला सहभागी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या