बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हॉटेल, घरं भाड्यानं घेऊन पॉर्न शुटिंग, राज कुंद्राच्या रॅकेटची सर्व माहिती उघड

मुंबई | शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तब्बल 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या राज कुंद्राच्या भावाने ‘केनरीन’ नावाची कंपनी सुरू केली होती. सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी राज कुंद्राने परदेशातच  या कंपनीची नोंदणी केली होती. याद्वारे परदेशात दाखवल्या जाणाऱ्या पॉर्न चित्रपटांचं चित्रीकरण भारतामध्ये व्हायचं आणि वी ट्रान्सफरच्या मदतीने ते परदेशात पाठवलं जायचं.

राज कुंंद्रा हॉटेल्स आणि घरं भाड्याने घेऊन तिथे अश्लील चित्रपट शूट करायचा. इंडस्ट्रीमध्ये नवीन येणाऱ्या मॉडेल्सला बॉलीवूडमध्ये संधी देण्याचं आश्वासन देऊन अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी भाग पाडलं जात होतं. तसेच हे चित्रपट पाहण्यासाठी लोकांकडून देखील पैसे घेतले जात होते.

दरम्यान, याप्रकरणी राज कुंद्राविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. राजविरूद्ध त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आज राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या –

“हिच्यासोबत जाणार नाय खूप मारते हो”, तरुणाच्या तक्रारीनंतर तरुणीचा पोलीस स्टेशनमधेच राडा

“माफ करा तांत्रिक कारणामुळे आज इंधन दरवाढ झाली नाही; असुविधेसाठी दिलगीर आहोत”

‘सामना’वरुन घमासान; नाना पटोले आक्रमक… म्हणाले, सूर्यावर थुंकू नका!

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; तब्बल इतक्या दिवसांपर्यंत पोलिस कोठडी

…अन् मला नग्न होण्यास सांगितलं, प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे कुंद्राच्या अडचणी वाढल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More