चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

रायपूर | साधारणतः आपण घरात चोरी झाल्याची तक्रार पोलिसात देतो. छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मात्र एका 60 वर्षीय महिलेने थेट घरच चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत काही घरांचे वाटप करण्यात आले. या योजनेत महिलेने 80 हजार रुपयांची रक्कमही भरली होती. तरी देखील तिला अद्याप घर मिळाले नाही.

सरकारी अधिकाऱ्यांनी माझे घर चोरी केले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठी मी पैसेसुद्धा भरले आहेत, असं ही महिला सांगत आहे. 

दरम्यान, 2018-19 मध्ये गावात लोकांना 72 घरे वाटप करण्यात आली होती. यामधील 71 घरांचे बांधकाम झाल्याचं गावच्या सरपंचानी सांगितलं. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून चैकशी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

-राजस्थान जिंकण्यासाठी घाम गाळत आहेत आदित्य ठाकरे!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?

-शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही!