बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहिणींसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली | सध्या देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर (Central Goverment) विरोधक जोरदार टीका करत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत कपात (Cuts) केली होती. परिणामी देशभरातून गॅसच्या किंमतीत कपात (Cuts In Prize Of Gas Cylinder) करण्याची मागणी करण्यात येत होती. अशातच आता सरकारनं गॅस किंमतीबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. (Household gas cylinders likely to be cheaper)

सध्या घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडरच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. केंद्र सरकारनं मोठा गाजावाजा करत उज्वला गॅस योजना अवघ्या देशात राबवली होती. पण या योजनेला सध्या सर्वत्र टीकेला सामोरं जावं लागत आहे. गत एक वर्षापासून देशात महागाईत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारवर देशभरातून दबाव निर्माण होत आहे.

केंद्र सरकार जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याच्या कारणानं देशातील इंधन दरकपातीचा निर्णय घेऊ शकतं. लवकरच एलपीजीच्या सदस्यीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत गॅसच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिक सध्यातरी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान, सध्या गॅसच्या किंमती हजाराच्या घरात आहेत. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत तर तब्बल 2 हजार रूपयांच्या पुढे सरकली आहे. याचा परिणाम म्हणून सर्वत्र हाॅटेलमधील जेवण महाग होत आहे. घरगुती सिलेंडर सध्या 900 रूपयांवर आहे.

थोडक्यात बातम्या 

“भाजप आता राज्यात 1 नंबरचा पक्ष बनलाय”

‘2 नंबरी सरकारची 2 वर्ष…’, चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या ‘त्या’ भेटीविरोधात गृहमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

‘शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More