मुंबई | पत्नीने चहा देण्यास नकार दिल्यामुळे पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तीची हत्या केली. या प्रकरणाच्या सुनवाणीदरम्यान मुंबई उच्च न्यायलयाने महत्तवपुर्ण निर्णय दिला आहेे. कोणताही विवाह हा समानतेच्या आधारावर अवलंबून असतो. या कारणामुळे गृहिणीलाच सर्व घरकाम करण्यासाठी जबाबदार ठरवता येणार नाही, असं हाय कोर्टने म्हटलं आहे.
हाय कोर्टात आलेल्या प्रकरणामध्ये आरोपीच्या पत्नीने सकाळी चहा देण्यास नकार दिल्यामुळे दोघांच्यात वाद पेटला. याच दरम्यान आरोपीने पत्नीच्या डोक्यात हातोडी घालून तीची हत्या केली. एवढचं नाही तर आरोपीने पुरावे मिटवण्यासाठी तीच्या रक्तानी आंघोळ केली. मात्र हा सगळा प्रकार त्यांच्या 6 वर्षांच्या लहान मुली समोर घडला असून आपल्या वडिलांच्या विरोधात तीने साक्ष दिली आहे.
या प्रकरणाचा निर्णय न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने दिला आहे. न्या. मोहिते-डेरे यांनी सांगितल्याप्रमाणे पत्नीकडून घरातील सर्व कामांची अपेक्षा करणं चुकीचं असून गृहिणीकडूनच सर्व कामांची अपेक्षा केली जाते. मात्र ही पती-पत्नीच्या नात्या मधली असमानता आहे तसेच याला महिलेंची सामाजिक परस्थिती देखील कारणीभूत ठरती. या परस्थितीमुळे महिला स्वतःला जोडीदाराकडे स्वाधीन करतात ज्यामुळे पुरुषांना आपण प्रमुख असून पत्नी आपली मालमत्ता असल्याचा भ्रम होतो, असं देखील न्या. मोहिते-डेरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये आरोपीने सांगितलेल्या पती आणि पत्नीमध्ये झालेल्या युक्तीवादाला न्यायलयानं फेटाळून लावलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मी मर्द आहे हे उद्धव ठाकरेंनी परत कधीही म्हणू नये”
संजय राठोडांसाठी जमलेल्या गर्दीत कोरोना; महंत कबीरदास यांच्यासह 19 जण पाॅझिटिव्ह
‘कोरोनापासून बचावासाठी मी रोज…’; ‘या’ भाजप नेत्याचं अजब वक्तव्य
मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत
…म्हणून हृतिक रोशनने 75 कोटींची ती ऑफर धुडकावली!
Comments are closed.