बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांचं ठरलंय, 2024 मध्येही उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचंय”

मुंबई | शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात वाद वाढल्यानंतर अखेर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर देखील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढतच आहे. अशातच आता पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही जास्त फरत नाही. शिवसेनेच्या 56 जागा आहेत तर राष्ट्रवादीच्या 54 जागा आहेत. फरक केवळ 2 जागांचा आहे. 2024 मध्येही राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार अस्तित्वात येईल, असं शरद पवारांनी पुण्यात आपल्या मित्रांशी बोलताना खासगीत सांगितले होतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

शरद पवारांचं ठरलं आहे की, 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हटले आहेत. 2019मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र नव्हतो तेव्हा शिवसेनेने ठाणे महापालकेच्या निवडणूकीत स्वत:ला हवं तसं वॉर्ड पाडून घेतले, असा आरोप देखील त्यांनी शिवसेनेवर केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याची आता तुफान चर्चा होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“दुनिया में चु*** कमी नही”, व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणतात…

धक्कादायक! हेलिकॉप्टर अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा Accident

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं नेमकं कारण येणार समोर?

“अतिशय सुरक्षित असलेल्या चॉपरचा अपघात कसा झाला?, याची चौकशी केली जावी”

लसीच्या डोसची ऑर्डर मिळत नसल्यानं अदर पुनावांलांनी घेतला म्हत्त्वाच्या निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More