“शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?”
मुंबई | मनसुख हिरेन मत्यू प्रकरणावरून विधानसभेत विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीका केली होती. तर दुसरीकडे मनसेनेही या प्रकरणात उडी घेत शिवसेनेवर टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांंनी प्रकरणावरून सरकारला खोचक सवाल केला आहे.
सचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणात गुढं आणखी वाढलं आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस त्यांच्याचकडे सोपवल्या का जातात? तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू झाले?, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
2004 साली सचिन वाझेंना निलंबीत केलं होतं. 2007 साली त्यांनी राजीनामा दिला पण चौकशी चालू असल्या कारणाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यानंतर 2008 साली सचिन वाझे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतू नंतर ते पक्षाच्या कामात सक्रिय नव्हते.
दरम्यान, 16 वर्षानंतर 2020 मध्ये वझे पुन्हा पोलिस सेवेत रूजू झाले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या घरात घुसुन सचिन वाझेंनी अटक केली होती. त्यानंतर सचिन वाझे चर्चेत आले होते.
श्री सचिन वाझे ह्यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 6, 2021
थोडक्यात बातम्या-
‘त्या रात्री तावडे नावाच्या माणसाचा फोन अन्…’; मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती
‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी
“वझे बिझे वाजत गेेले, आम्हाला त्यांची भिती दाखवू नका”
मनसुख यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती
महाविकास आघाडीतील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण
Comments are closed.