बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गरज नसताना उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं?”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण आरक्षणाच्या मुद्यावरून तापताना दिसत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर आता भाजपचे एससी सेलचे नेते धम्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झालं आहे. गरज नसताना यासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमली गेली आणि त्या समितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना दिलं गेलं. मराठा समाजाच्या नेत्याला अनुसुचीत जाती, जमातीच्या समस्या कोणत्या प्रकारे समजणार? या सरकारमुळे पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झालं आहे. पदोन्नीत आरक्षण मिळालं नाही, तर रस्त्यावर उतरु’, असा इशारा देखील मेश्राम यांनी दिला आहे.

गरज नसताना मंत्र्याची उपसमिती करुन या उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं दिलं गेलं?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी समाजाला मिळालेलं राजकीय आरक्षण संपण्यासाठी भाजप जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होता.

दरम्यान, मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर पदोन्नतीत आरक्षणाबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारने रद्द केलेलं पदोन्नतीतील आरक्षण आरक्षित वर्गाला देण्यात यावं, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

रितेश देशमुखनं मुलासाठी गायली अंगाई, पाहा बाप-लेकाचा क्युट व्हिडीओ

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

दारूसाठी काय पण! जिवाचा आटापिटा करत वाचवली दारू, व्हिडीओ व्हायरल

पुण्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More