मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा देवेंद्र फडणवीस कशी करू शकतात – अनिल देशमुख
मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: राज्याचे गृहमंत्री या नात्याने पोलिस दलाचे नेतृत्व केलेे आहे. 5 वर्षे याच पोलिसांनी त्यांना प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली, साथ दिली. ते माजी गृहमंत्री मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशाप्रकारची भाषा कसे वापरु शकतात? असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे, तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही. देवेंद्र फडणवीस एवढा राग का काढत आहेत याबाबतच्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत, असंही अनिल देशमुख म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे म्हणून सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत करू नका, असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले.
दरम्यान, सचिन वाझे यांच्याविरोधात एवढे पुरावे समोर आले आहेत. पण त्यांनी कोणत्या एका पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने असं केलं तर काळ त्यांना माफ करणार नाही. त्यामुळे सचिन वाझे यांना आधी निलंबित करा, अशी जोरदार मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
थोडक्यात बातम्या –
खासदार नुसरत जहाँ यांच्या ‘त्या’ खास टॅटूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी
सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात राडा; फडणवीसांनी केले गंभीर आरोप
कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू
Comments are closed.