बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवर आता शिवसेना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेची कार्यकारणी बैठक आज पार पडली असून सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी कार्यकारणी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला.

सर्वांना वाटलं शिवसेना फुटली. मात्र, उद्धव ठाकरेंची शिवसेना संयमी आहे त्यांनी संयम राखला. सगळ्या गोष्टीत संयम राखला पण तुम्ही आमची शिवसेनाच बुडवायला निघालात, असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

आम्ही शांत राहण्याचं नेहमीच आवाहन करतो. मात्र, त्यांनी शिवसेनेच्या आईवर हात घातला आहे. ते आता कसे शांत राहतीस, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तर एकनाथ शिंदेंचं नेतेपद काढण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य देखील किशोरी पेडणेकर यांनी केलं.

दरम्यान, शिवसेनेचा एकच बाप आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे मतं मागायचे असतील तर स्वत:च्या बापाच्या जीवावर मागा, शिवसेनेच्या बापाच्या जीवावर नाही, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मतं मागायची आहेत तर तुमच्या बापाच्या नावाने मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नाही”

मोठी बातमी! शिवसेनेला धक्का, शिंदे गटाचे नाव ठरले

बंडखोर आमदारांच्या कुटुंबांची सुरक्षा काढून घेताच एकनाथ शिंदे कडाडले

शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई, वाचा कारवाईत कोणाकोणाची नावे

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More