बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

मुंबई | गेल्या काही वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा समोर येत आहे. केंद्र सरकार कायद्यांमध्ये बदल करून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि विचार स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचा आरोप गेल्या काही वर्षात केला गेला होता. याच मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते. आता आणखी एका प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी माहिती व तंत्रज्ञान अधिनियम, 2009 च्या काही नवीन नियमांवर आक्षेप घेतला होता. या नवीन नियमांमुळे देशातील नागरिकांना मुक्त भाषण करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर या नवीन नियमांमुळे कायद्याच्या चौकट ओलांडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध लावले जात असल्याची एक यचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं. अतिरिक्त साॅलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली. पीसीआयने पत्रकारांनी आचारसंहिता पाळण्याची नियमावली लिहून दिली आहे. त्यांनी उल्लंघन केल्यास त्यांना शिक्षा देखील सुनावली जाते. मग, तुम्ही कोणाच्या विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसे घालू शकता?, असं म्हणत न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत व्यक्तीला विचार स्वातंत्र्य नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकत नाही, असंही मुंबई उच्च न्यायलयानं म्हटलं आहे. याआधीही सर्वोच्च न्यायलयानं केंद्र सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावरून सुनावलं होतं.

थोडक्यात बातम्या-

न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यपालांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

चिंताजनक! कोरोना लस घेऊनही डेल्टा प्लस व्हेरिएंटची होतेय लागण

कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यायला हवा, मी स्वत: घेतला- सायरस पुनावाला

“पंकजा मुंडेंवर आरोप करून शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम सत्ताधारी करतायेत”

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More