बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

लातूर | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत लातूरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. परभणीमधील सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मूळचे लातूरचे रहिवासी गणेश शाहूराज तोडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान गणेश तोडकर हे रुग्णालयात दाखल असताना त्यांची मुलगी सांचल गणेश तोडकर या चिमुकलीने आपले बाबा लवकर बरे व्हावे आणि सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं यासाठी एक चित्र काढून त्यामध्ये स्वतःला आणि आपल्या बाबांना मिठी मारताना दाखवलं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बाबा बरे होऊन लवकर परत येतील, या आशेवर असलेल्या त्या चिमुकलीला मात्र ते आपलं चित्र बाबांना दाखवताच आलं नाही, कारण 4 मे रोजी गणेश तोडकर यांचं लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झालं.

13 एप्रिल रोजी गणेश यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपल्या मूळगावी लातूर येथे रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. तब्बल 5 दिवसांनंतर तब्येतीमध्ये सुधारणा झाली म्हणून त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी सोडण्यात आलं. घरी आल्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांनी एचआरसिटी चाचणी केली, यामध्ये त्यांचा स्कोअर 18 आला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या मित्र परिवाराच्या मदतीने लातूरच्या न्युलाईफ या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र ही कोरोनाची लढाई लढताना 4 मे रोजी गणेश तोडकर यांचं दुःखद निधन झालं.

गणेश तोडकर यांच्यामागे पत्नी व दोन लहान मुली आहेत. कोरोनासारख्या संकटाशी लढा देताना गणेश तोडकर यांचा दुर्दैवी अंत झाला तसेच त्यांच्या निरागस आणि निष्पाप मुलीदेखील पोरक्या झाल्या. कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यातच लातूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांनी सरकारने नेमुण दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

सांचल तोडकरने काढलेलं चित्र –

थोडक्यात बातम्या

पुणे हादरलं! चक्क गुंडाने केली पोलीस हवालदाराची हत्या

“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप

केंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण

मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण मृतांचा आकडा वाढला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More