बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?; एम्सच्या संचालकांनी दिली माहिती

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल का? याबाबत वक्तव्य केलं आहे.

भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून आलेलं नाही. दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या बालकांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली तसेच काही बाधित बालकांना इतर आजार असल्याचं दिसलं. यापुढेही बालकांमध्ये कोरोनाचा गंभीर संसर्ग आढळून येईल असं मला वाटत नाही, असा विश्वास गुलेरिया यांनी व्यक्त केला.

रुग्ण संख्या कमी झाली, की अनलॉक होते आणि लोक निष्काळजी बनतात आणि पुढची लाट सुरू होते. जोवर अधिकांश लोकांचे लसीकरण होत नाही, तोवर आपल्याला सतर्कता बाळगावी लागेल. सध्या कुठल्याही देशात असा कुठलाही डेटा आलेला नाही, ज्यावरून मुलांना अधिक धोका आहे, असं सांगितं जाऊ शकेल, असंही गुलेरिया यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, लोकांत आतापासूनच तिसऱ्या लाटेची भीती दिसत आहे. काही तज्ज्ञांचं मत होतं की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल. यामुळं मुलांचे पालक चिंतीत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच- संजय राऊत

“अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, खासदारकीचा राजीनामा द्यावा”

‘पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी…’; मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

व्हायरल व्हिडीओमुळं प्रसिद्ध झालेल्या ‘बाबा का ढाबा’मध्ये पुन्हा शुकशुकाट?, रेस्टॉरंट बंद करण्याची आली वेळ

मोदी-ठाकरेची ‘ती’ अर्धा तासाची भेट; महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस बदलणार?

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More