बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी मलिकांची पोलखोल करणार, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”

मुंबई | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मागील काही दिवसांपासून समीर वानखेंडेना धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आता भाजप नेते मोहीत भारतीय यांनी नवाब मलिकांवरच हल्ला चढवत “भंगारवाला करोडपती कसा झाला?” अशा बोचऱ्या शब्दात सवाल विचारला आहे. याशिवाय अनेक खोचक आरोपही मोहीत भारतीयांनी लगावले आहेत.

मोहीत भारतीयांनी याशिवाय नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची सपंत्ती असल्याचा गौफ्यस्पोटही केला आहे. शिवाय मोहीत भारतीयांनी नवाब मलिकांकडे एकूण 22सपंत्ती असून त्याचं संपूर्ण कुंटूंंब फॅमिली ट्रस्टच्या नावाखाली जोडलं गेलं असल्याचा आरोप केलाय.त्यामुळे सध्या राजकिय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

मोहीत भारतीयांनी आज मी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. उत्तर द्यायची त्यांची लायकी उरणार नाही. अशा शब्दात मोहीत भारतीयांनी मलिकांवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवाय सलीम जावेद-ने सुरू केलेल्या चित्रपटाचा दि- एन्डं मीच करणार असंही ते म्हणाले आहेत.

मोहीत भारतींयानी नवाब मलिकांवर अनेक आरोप लावत कठोर शब्दात टीका केली आहे. त्यानंंतर आता मोहीत भारतीय यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व पोलखोल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेतून नेमकं काय सत्य समोर येणार? याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोल-डिझलचे दर कमी करायला सांगावेत”

आर्यन खान प्रकरणाचा नव्याने तपास करणारे संजय सिंह कोण आहेत?, जाणून घ्या

“नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही”

समीर वानखेडे नाही तर ‘हे’ अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More