वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; किरीट सोमय्यांचा खोचक सवाल
मुंबई | राज्यातील सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईनची विक्री करण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली आहे. त्यावरून विरोधक महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. कोण ढोकळा विकतो आणि कोण काय करतो ते सोडा. तुम्हाला वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. राऊत यांच्या कुटूंबातील कोणीही उद्योग व्यवसायामध्ये नाही मग पार्टनरशीप कशी दिली? असाही सवाल त्यांनी केला आहे.
राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेटलमेंट घडवून आणलीय का? पडद्यामागे काय लपवत आहात? या वाईन उद्योगाची 100 कोटींची उलाढाल आहे. त्याचे लाभार्थी कोण आहेत?, अशा प्रश्नांची सरबत्ती किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच अनिल देशमुख प्रकरणाचा उल्लेख यावेळी किरीट सोमय्यांनी केला आहे. सीताराम कुंटे यांनी कबुली दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बोलती बंद झाली आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बदल्यांच्या नावाखाली वसुलीच रॅकेट सुरू आहे. या सरकारने सर्व आरोप स्वीकारलेले आहेत. आता सगळे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या प्रकरणांवर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उत्तर द्यावं, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई कधी होणार ते सांगावं, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“पैसे कमविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत”
“महाराष्ट्रात पुढचे 25-30 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही”
हाॅटेलच्या टेरेसवरुन उडी मारत फॅशन माॅडेलचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांना व्हिडीओ काॅल करत म्हणाली….
IPL 2022: ‘या’ स्टेडिअमवर रंगणार यंदाचे Playoff चे सामने?
Budget 2022: सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर – रामनाथ कोविंद
Comments are closed.