मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ईडी आणि तपास यंत्रणांचा वापर कसा करताय? असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल, “महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोललं तर लगेच तुरुंगात टाकलं जातं. आमच्यावर आरोप झाला की महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. मग आता तुम्ही ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात?”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावलाय. शिवाय त्यांच्या मुलाचीही चौकशी केली. नशीब त्यांना अजून नातू नाहीये नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली.
कदाचित उद्या सांगण्यात येईल की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर त्याला आधी इथे घेऊन या. ही विकृतीच सुरु असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार
प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी मुहूर्त सापडला
“रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”
चिंताजनक! ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवीन विषाणू
नरेंद्र मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये- राजू शेट्टी