बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कसा पसरतो ब्लॅक फंगस?, बचावासाठी काय कराल?, महत्त्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | कोरोनाने आधीच देशभर थैमान घातलेलं आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येईल पण इतक्या मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढेल याची कल्पनाही नव्हती. राज्य सरकारने तशा प्रकरची कोणतीही तयारी केलेली नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. मात्र दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे कोरोना कुठे थांबला नाही तर ‘ब्लॅक फंगस’ म्हणजेच ‘म्युकरमायकोसिस’ या जीवघेण्या आजाराने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.

म्‍युकरमाइकोसिसचे विषाणू माती, हवा आणि अगदी जेवणातही आढळतात. पण ते फार प्रभावी नसतात. त्यांच्याद्वारे साधारणपणे संसर्ग पसरत नसतो. कोरोनाच्या संकटाच्या आधी या संसर्गाची प्रकरणं अत्यंत कमी होती पण आता कोरोनाच्या संकटामुळं याचेही रुग्ण मोठ्या संख्येनं समोर येऊ लागले असल्याचं दिल्‍लीमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

डायबेटीजच्या रुग्णांनां कोरोनाची लागण झालेली असेल आणि त्यांना स्टेरॉइड्स दिले जात असतील, तर त्यांना ब्लॅक फंगसचं संक्रमण होण्याचा सर्वात जास्त धोका असल्याचं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. ब्लॅक फंगस चेहरा, नाक, डोळे आणि मेंदूवर हल्ला करतो. त्यामुळं अंधत्व येण्याची भीती असते. फुफ्फुसांमध्येही त्याचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचं गुलेरिया म्हणाले.

दरम्यान,  इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितलं आहे की, डॉक्टरांनी रुग्णांच्या चेहऱ्याच्या एका बाजुला सायनसच्या वेदना किंवा नाक बंद होणे अशा प्राथमिक लक्षणांवर नजर ठेवायला हवी. फंगसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी डोकेदुखी, सूज येणं, संवेदना जाणं, दातांमध्ये वेदना किंवा दात ढिले होणं यावर नजर ठेवायला हवी, असंही गुलेरिया यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी, पाहाल तर हैराण व्हाल

‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणून…’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप

रिक्षातून कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न, चालकासोबत घडला खतरनाक प्रकार, पाहा व्हिडीओ

कोरोनाचे नियम धाब्यावर; पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More