बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सारं जग झुकलं मात्र ‘हा’ पठ्ठ्या एकटा तालिबानपुढं उभा ठाकलाय, याचा गड अजूनही अभेद्य कसा?

काबूल | तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर पुर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. तालिबानी सत्ता स्थापनेसाठी हालचाली करताना दिसत आहे. मात्र अफगाणिस्तानचे पहिले आणि माजी उपाध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत: ला काळजावाही अध्यक्ष घोषीत केलं आहे. तालिबानला त्यांनी धुडकावलं असून तालिबानविरोधात लढा देण्यासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

तालिबानने संपुर्ण देशावर कब्जा केला असताना अमरूल्लाह सालेह कशाच्या जीवावर तालिबानला आव्हाव देत आहेत?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर अमरूल्लाह सालेह हे अफगानिस्तानच्या पंचशीर खोऱ्यात लपले आहेत. पंचशीर हा भाग असा आहे की त्यावर अजुनही तालिबान आणि सोव्हिएत संघ ताबा मिळवू शकले नाहीत.

कोणत्यागी परिस्थितीत तालिबान्यांसमोर हार पत्करणार नाही. नायक अहमद शाह मसूद यांच्या आत्म्याशी आणि वारसासोबत धोका करणार नाही. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना मी नाराज करणार नसून तालिबानसोबत एकत्र कधीच राहणार नसल्याचं अमरूल्लाह सालेह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 1990 च्या सोव्हिएतच्या आणि 1990 च्या तालिबान्यांना मिळवता आला नाही. पंचशीर भागाला नॉर्दन अलायन्सचे माजी कमांडर अहमद शाह मसूदचा यांचा गड मानलं जातं.

थोडक्यात बातम्या- 

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, उद्याच पत्नीची चौकशी होणार!

भाजपने अमर, अकबर, अँथनी हा चित्रपट पाहिला नसेल तर पाहावा- नाना पटोले

अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षाला नवं वळण, ‘या’ नेत्यानं तालिबानला धुडकावलं! म्हणाले…

तालिबानची पहिली पत्रकार परिषद, जगाला केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More