Top News पुणे महाराष्ट्र

गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी!

Photo Courtesy-Pixabay

पुणे | सध्या राज्यात कोरोना रूग्णांची आकडेवारी वाढू लागली आहे. पुण्यातही कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना बाहेर पडल्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टेंसिंगसह वेळोवेळी सॅनिटायझरचा वापरणे या गोष्टींचा वापर करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र तरीही लोक नियम धाब्यावर बसवत मनमानी कारभार करताना दिसत आहेत. लोकांच्या याच बेपरवाईमुळे कोरोना डोक वर काढू लागला आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 414 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर  दिवसभरात 247 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील एक व्यक्ती पुण्याबाहेरील होता.

पुण्यात सध्या 160 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1,97,330 इतकी आहे. तर पुण्यात 2561ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  आत्तापर्यंत एकूण 4281 जणांना कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,89,947 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 4634 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी वेळीच जागृक व्हायला हवं अन्यथा कोरोना महामारीने आपले हातपाय पुन्हा पसरले तर मानवजातीला मोठी हाणी होण्याची शक्यता आहे. नव्या कोरोनाचे रूग्णही राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये सापडले आहेत.

थोडक्यात बातम्या-

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?- करूणा धनंजय मुंडे

कार्यालयीन वेळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानांकडे मागणी

मास्टरच्या गाण्यावर खेळाडू थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘हा’ व्हिडीओ

सहा वर्षे सत्तेत असूनही चुका दुरुस्त करता आल्या नाहीत का?- शरद पवार

जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं- रिंकू राजगुरू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या